संगमेश्वर:- तालुक्यातील फुणगूस येथे समर्थ उत्कर्ष मंडळ फुणगूस कडेवठार यांच्या सौजन्याने विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. समर्थ उत्कर्ष मंडळ फुणगूस कडेवठार यांनी सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले आहेत. गुरूवार 4 जुलै रोजी फुणगुस येथील प्राथमिक मराठी शाळा व अंगणवाडी आणि कातळवाडी अशा तीन शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. समर्थ उत्कर्ष मंडळाने केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या कार्यक्रमावेळी मंडळाचे उपाध्यक्ष वैभव चौगुले, अनिल घेवडे, साई घेवडे हर्ष घेवडे, वेदांत घेवडे, सुनील मोरे, राजेंद्र घेवडे, राज पांचाळ, ओंकार पवार, सुजित शिगवण, गणेश रहाटे, गजानन पुराणिक, सखाराम थुळ व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.