मुंबई:-टी २० विश्वचषकावर नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या भारतीय संघाचा मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम दरम्यान विजयरथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखोंच्या जनसमुदायाने जल्लोषात स्वागत केले. यानंतर वानखेडे स्टेडिअमवर आलेल्या संघाचे मैदानावर भरगच्च भरलेल्या मुंबईकर क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन ‘महा’गौरव करण्यात आला. यावेळचे दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे होते. मरीन ड्राईव्हवर कर्णधार रोहित-प्रशिक्षक द्रविड यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. विजयरथात उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या हातात विश्वचषक पाहायला मिळाला. तसेच विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि इतर खेळाडू आपल्या चाहत्यांचं उत्साहाने शूट करताना पाहायला मिळाले.
विश्वविजेत्यांचा ‘महागौरव!’ वानखेडेवर 125 कोटींचे बक्षीस प्रदान

बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आमदार आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. चहल आणि कुलदीप तिरंगा परिधान करताना दिसले.१७ वर्षांनंतर भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर विजयी शिलेदार मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाले. चार तासांपासून संघाचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये तरुणाई आणि चाहते एकवटले होते. स्टेडिअममध्ये झालेली प्रचंड गर्दी आणि बसण्याची मर्यादा संपल्याने प्रवेश बंदी करण्यात आली. तरीही चाहत्यांकडून अति प्रमाणात गर्दी करण्यात आली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी संघातील पोरं म्हणजे माझ्यासाठी कुटुंबासारखी आहेत. कोणामध्येही अटिट्युड नाही. सर्वांनी मेहनत घेतल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला.
मुंबईकर चाहत्यांचं रोहित शर्माने हातवारे करत अभिवादन केले. आम्हाला विश्वचषक जिंकण्याची जितकी इच्छा होती, त्यापेक्षा जास्त चाहते उत्साही होते. हा संघ खास आहे, या संघाचं नेतृत्व कऱण्याची संधी मिळली, मी खूप लकी आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. मला या संघाचा अभिमान आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. प्रत्येकानं आपलं १०० टक्के योगदान दिले, असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते, सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला. सूर्यकुमार यादव यानं असे झेल घेण्यासाठी अनेकवर्षे सराव केलाय. या निमित्ताने अन्य खेळांडूंनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.