महाराष्ट्र सरकारकडून चौघांना प्रत्येकी १ कोटींचे बक्षिस जाहीर
मुंबई:-कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी विश्वचषक जिंकून भारताची मान जगात उंचावली आहे.यामध्ये सर्वच खेळाडूंनी दिलेला आपला सहभाग अतुलनीय आहे. त्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा विशेष उल्लेख होतो.
दरम्यान आज दुपारी ४ वाजता विधानभवनात भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव और यशस्वी जायसवाल यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचे निमंत्रण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. याशिवाय या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.