राजापूर/तुषार पाचलकर:-भारतीय पोलीस सेवेच्या निवडश्रेणीत पदोन्नतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना पदस्थापना देण्यात आली असून तशी नियुक्ती काल जाहीर करण्यात आली आहे.
शासन आदेश,प्रमाणे कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील भा.पो.से. अधिका-यांना,भारतीय पोलीस सेवेच्या निवडश्रेणीत, पदोन्नती देण्यात येत असून त्यांची , याद्वारे, स्वस्थानी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे-रुटिंग स्वरूपाची बढती मिळाल्या बद्दल बोलताना रत्नागिरी पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की,खरं तर सदरची बढती जानेवारीतच व्हायला हवी होती परंतू एक ट्रेनिंग बाकी राहिले होते ते फेब्रुवारीत पूर्ण करून इतर प्रक्रियेला वेळ लागल्याने थोडा उशिरच झाला. तरीदेखील आज प्रक्रिया पूर्ण होऊन बढती मिळाल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं