रक्तदान शिबिरांची गरज
रत्नागिरी:-सध्या रत्नागिरी जिल्ह्यात डेंगू रोगाची साथ पसरल्यामुळे मोठ्या संख्येत रुग्णांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे. यातिल बऱ्याच रुग्णांना रक्तातील प्लेटलेटची नितांत आवश्यकता असल्याचे डाँक्टर सांगत आहेत. यातच प्लेटलेटची उपलब्धता कमी होत असून रुग्णांचे नातेवाईक रक्तपेढीत प्लेटलेट साठी धाव घेत आहेत.
शासकिय रुग्णालयात प्लेटलेटची भीषण टंचाई असुन खासगी रुग्णालयात त्याची उपलब्धताच नाही. म्हणुन जिल्हा रुग्णालयाने सोमवारी तातडीचे रक्तदान शिबिर घेतले. पावसाळा सुरु होताच जिल्ह्यात डेंग्युच्या रुग्णांची संख्या आता वाढायला लागली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डेंग्युचे 127 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये एकट्या रत्नागिरी तालुक्यात 90 तर ग्रामिण भागात 34 रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डेंग्युच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता जिल्हा आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामिण रुग्णालयात डॉक्टरांची उपलब्धता कमी आहे. मात्र जिल्ह्यातील डेंग्युची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांशी समन्वय साधुन उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच सध्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेसा औषधपुरवठा असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र जिल्हा शासकिय रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्तातील प्लेटलेटचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.