“काँग्रेस कार्यालयच्या उदघाट्न प्रसंगी एकमुखी ठराव”
राजापूर/तुषार पाचलकर:- ज्या पक्षाने गेल्या सत्तर वर्षात देशाला घडवलं, देशाच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलला आज त्या पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधी,इंदिरा गांधी, राजीव गांधी सोनिया गांधी नंतर युवकांचेच न्हवे तर संपूर्ण देशाचे नै्तृत्व करण्याची क्षमता ठेवणारे राहुल गांधी करीत आहे.. आणि यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळतं आहे,इतकेच न्हवे तर महाराष्ट्रातील अनेक पक्ष फुटले, वेगळे झाले तरी आजही काँग्रेस पक्षात एकजूट पहायला मिळतं आहे यामुळेच की काय आज नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला हे सर्वश्रुत आहे.यामुळे काँग्रेस पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर तालुक्यातही बळकटी मिळाली आहे.
असे उदगार आज झालेल्या राजापूर तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी काढले यावेळी तालुका संपर्क कार्यालय भविष्यात काँग्रेस कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे, असेही ते बोलले.पक्षाचे स्वमालकीचे कार्यालय असावे असे मत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडी च्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मिळावा असा एकमुखी ठराव तसेच मागील विधानसभा निवडणुकीत काहींशा फरकाने पराभूत झालेले अविनाश लाड याचा मागील पाच वर्षात मतदार संघात असलेला जनसंपर्क पाहता त्यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला शाबूत ठेवावा अशी एकमुखी मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी ता अध्यक्ष किशोर नारकर, राजापूर अर्बन चेअरमन सौ अनामिका जाधव, माजी तालुकाध्यक्क्ष बंड्या बाकळकर, जेष्ठ कार्यकर्ते विलास गांगण, प्रकाश आमकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेचछा दिल्या यावेळी जिल्हा सचिव संतोष गोताड, माजी नागराध्यक्षा मुमताज काझी, सुरेश कोळेकर, मंदार सप्रे, युवक विधानसभा अध्यक्ष नुयीद काझी, वैभव कु्वेस्कर, दाजी चव्हाण, प्रकाश आमकर, नगरसेवक आसिफ मुजावर, मलिक गडकरी, विनायक सक्रे, जलाल प्रभुलकर, कमाल प्रभूलकर, दया शेलार बहुसंख्य कारकर्ते उपस्थित होते