चिपळूण : डॉक्टर्स डे, सी.ए. डे आणि कृषी डे याचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या वतीने सावर्डे परिसरातील डॉक्टर्स, शेतकरी तसेच सी.ए. यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ सावर्डेचे अध्यक्ष ला.सतीश सावर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून झोन चेअरमन MJF ला. डॉ. निलेश पाटील उपस्थित होते. सावर्डे परिसरातील पंधरा शेतकरी यांना शेतीची अवजारे अणि खते देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉक्टर्स अणि सी.ए. यांना शाल पुष्प अणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आहे. तसेच माजी पंचायत समिती सभापती सौ पूजा निकम यांच्या उपस्थितीत केदारनाथ हॉल परिसरात पाम या झाडांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी लायन्स क्लबचे सचिव ला.व्याघ्रांबर नेहतराव, खजिनदार ला.अजय उपरे, सदस्य MJF ला.गिरीश कोकाटे, ला.राजेश कोकाटे, ला. डॉ.दर्शना पाटील, ला. डॉ.रश्मी पाटील, ला.डॉ.वर्षा खानविलकर, ला.सीताराम कदम, ला.प्रकाश राजेशिर्के, ला.डॉ. समिद चिकटे, ला.अरविंद भंडारी तसेच सर्व्हिस ॲक्टिव्हिटी प्रमुख ला.अदिती निकम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.अरविंद भंडारी यांनी केले. तसेच आभार सचिव ला.नेहतराव यांनी मानले. उपस्थित सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.