उद्योगमंत्री उदय सामंत यांचे महिला व बाल विकासमंत्र्यांना पत्र
मुंबई:-राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहिर केली आहे. यामुळे महिलांना लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 रूपयांचा लाभ होणार आहे. त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरु आहे. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, महसूल विभागाने यापूर्वी लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले दिले असून त्यामध्ये शैक्षणिक व वैद्यकीय योजनांसाठी लागू राहील असे नमूद केले आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कमी वेळेत माझी बहीण या योजनेचा लाभ घेणेकरीता यापूर्वी महसूल विभागाने लाभार्थ्यांना शैक्षणिक व वैद्यकीय योजनेसाठी दिलेले उत्पन्नाचे दाखले तसेच अधिवास, जन्माच्या दाखल्याऐवजी शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला व आधार कार्ड वरील तपशीलानुसार माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्राहय धरणेबाबत तात्काळ निर्देश देण्यात यावे से त्यांनी निवेदनात म्हटले आहे.