अशोकदादा वालम यांचा पुढाकार
मुंबई: कुणबी समाजाचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी बळीराज सेना अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या पुढाकाराने राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर रात्री ८:३० ते ११:३० वाजेपर्यंत एक मॅरेथॉन बैठक झाली. सदर बैठकीत तिलोरी कुणबी ८३ मध्ये पोट जात म्हणून समाविष्ट करून घेणे, बेदखल कुळांचा प्रश्न निकालात काढणे, कोकणातील प्रत्येक तालुक्यात कुणबी सांस्कृतिक भवन शासनाने बांधून देणे, शामराव पैजे कोकण आर्थिक विकास महामंडळातून कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मधील तसेच इतर व्यावसायिकांना बिनव्याजी भांडवल देण्यात यावे, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज हा शासकीय कार्यक्रम घेण्यासाठी GR काढणे, बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेणे, महाराष्ट्रातील शाळांच्या खाजगी कंत्राटी वाहन संघटनेचा विषय मार्गी लावणे, पालघर, शहापूर, ठाणे मधील इको सेन्सिटिव्ह झोन यावर मार्ग काढणे अशा अनेक प्रश्नांवर प्रदीर्घ सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊन, तसा तो उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आला.
या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री:- एकनाथजी शिंदे साहेब, उद्योग मंत्री मा. ना . श्री उदयजी सामंत, बळीराज सेना अध्यक्ष अशोकदादा वालम, महसूल खात्याचे प्रधान सचिव, समाज कल्याणचे प्रधान सचिव, तसेच विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते, बळीराज सेनेचे प्रकाश तरळ, नंदकुमार मोहिते, सुरेश भायजे, कुणबी समाजोन्नती संघाचे सदानंद काष्टे, अरविंद डाफळे, बबन उंडरे, हरिश्चंद्र पाटील, गणेश मौले, अशोक करंजे , कृष्णा वने, श्रावण (बाळा) इंगळे, राजाराम ढोलम, प्रकाश चांदिवडे, संतोष चव्हाण, संदीप गावडे, संदीप तांबट, दीपक कनेरी, किसन किंजले, श्याम जगताप, संजय चव्हाण,मनोज पवार, पराग वालम, साई इंगळे, अॅडः-राहुल ठाकरे, मधुकर शिंदे, प्रकाश भोसतेकर, संजय गोंधळी, चंद्रकांत कोकमकर,सत्यवान यादव, मनोहर पवार, पांडुरंग हुमणे -( महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व पनवेल रिक्ष्या विद्यार्थी वाहक संस्था ) सखाराम पोटले, प्रभाकर धनावडे, रमेश कानवले, बळीराज सेना मुंबई महिला अध्यक्षा डॉ. राखी केळसकर सौ. स्मिता गोंधळी, सौ.रुचिता बोलाडे, सौ.मानसी धनावडे, शंकरराव म्हस्कर, राजाभाऊ कातकर, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. प्रकाश भांगरत, शहापूरचे वसंत भेरे, अनिल निचीते, अशोक विशे, केसीसीआय अध्यक्ष श्री. प्रेमनाथ ठोंबरे सहसचिव ॲड. विनेश वालम आणि समाजबंधू सदर प्रसंगी उपस्थित होते .