रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील रुळावर असणाऱ्या लोखंडी चाव्या चोरट्यांची लांबविल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 28 ते 29 जून 2024 दरम्यानच्या काळात घडली. याप्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकूण 223 लोखंडी चाव्या चोरीला गेल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे विभागाच्या पानवल पूल ते कोंडवी या मार्गावरील रुळावर लोखंडी चाव्या नसल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्याना दिसून आले. त्यानुसार कर्मचाऱ्यानी ही खबर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना दिली. त्यानुसार वरिष्ठांनी पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने या चाव्या चोरल्या असल्याचा संशय रेल्वेच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञाताविरूद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.