चिपळूण:-सतरा महिन्यांपासून चोरीची वीज वापरुन महावितरण कंपनीचे 8.56 लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी तालुक्यातील तनाळी येथील रमेश कृष्णाजी वैद्य व सहदेव विष्णू चव्हाण (दोघे-तनाळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी चिपळूण पोलीस स्थानकात घडली. ही घटना तनाळी येथे घडली आहे. याबाबतची फिर्याद विजय राजेश धरमसारे (31, उप-कार्यकारी अभियंता, भरारी पथक, पेण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश वैद्य व सहदेव चव्हाण यांनी अनधिकृतपणे 23 नोव्हेंबर 2022 ते 23 एप्रिल 2024 या 17 महिन्याच्या कालाधीत 47962 युनिट्स वीज चोरुन वापरली. यातून 8 लाख 56 हजार 360 रुपयांची वीज चोरी करुन महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी विजय धरमसारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्य व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.