रत्नागिरी:-रत्नागिरी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आह़े. चव्हाण हे मागील तीन वर्षांपासून रत्नागिरीत कार्यरत होत़े. त्यांच्या काळात लाचलुचपत विभागाकडून सापळे रचून कारवाई करण्यात आल़ी. विशेष म्हणजे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवी व वैभव नाईक यांची देखील चौकशी चव्हाण यांनी केली होत़ी.
सुशांत चव्हाण हे लाचलुचपतचे अधिकारी होण्यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होत़े. जैतापूर आंदालनावेळी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होत़ी तसेच लाचलुचपतचे अधिकारी म्हणून देखील त्यांची कारकिर्द चांगली ठरल़ी. नुकतेच राज्य शासनाकडून राज्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या केल्य़ा. यामध्ये चव्हाण यांच्या नावाचा समावेश करण्यात आल़ा. लवकरच ते कोल्हापूर येथे रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले.