चिपळूण:-नावाने हाक मारल्याच्या रागातून तरूणाच्या मानेवर कोयतीने वार केल्याची घटना नागावे चैतन्य फर्निचरच्या परिसरात काही दिवसापूर्वी घडली. यात तरुण जखमी झाला असून वार करणाऱ्या तरुणावर अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण महादेव वाघे (35, अलोरे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद उमेश सुदेश जगताप (24, नागावे) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी 8.15 वाजण्याच्या सुमारास उमेश जगताप हा घरी कुटुंबासमवेत जेवणासाठी बसला होता. यावेळी त्याच्या पत्नीला लक्ष्मण वाघे याने नावाने हाक मारली. यातूनच उमेश व लक्ष्मण याच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने यातूनच लक्ष्मण याने रागाने उमेश याच्या घराच्या दाराजवळ असलेली कोयती त्याच्या डाव्या बाजूच्या मानेच्यावर डोक्यात जोरात मारली. यात तो जखमी झाला. याप्रकरणी लक्ष्मण याच्यावर अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.