रत्नागिरी:-तालुक्यातील गावडे-आंबेरे व नारशिंगे येथे दारू पिण्यासाठी बसलेल्या संशयितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दोघा संशयितांकडून दारू हस्तगत केल़ी तसेच त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकाश महादेव आंब्रे (60, रा.गावडे-आंबेरे, रत्नागिरी) व शंकर कृष्णा मांडवकर (36, रा.नारशिंगे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आंब्रे हा 29 जून 2024 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास गावडे-आंबेरे येथे दारू पिण्यासाठी बसलेल्या स्थितीत पोलिसांना आढळला तर शंकर मांडवकर हा 29 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास नारशिंगे येथे दारू पिण्यासाठी बसलेल्या स्थितीत पोलिसाना दिसून आला. दोन्ही संशयितांविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 84 नुसार गुन्हा दाखल केला.