रत्नागिरी:-तालुक्यातील मालगुंड येथे मटका-जुगार चालवल्याप्रकरणी तरूणाविरूद्ध जयगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. समीर यशवंत कदम (52, रा.गणपतीपुळे रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगुंड येथे मटका-जुगार चालवला जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार 29 जून 2024 रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपी हा अवैध असलेला मटका, जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार संशयित आरोपी याच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.