खेड:-खेड शहरातील खांबतळे येथे दोघांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी अल्ताफ मजीद शेख, नदीम मजीद शेख यांच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नसिमा शकिल शेख (27), साहिल शकिल शेख, शकिल शेख (35, तिघेही रा. खांबतळे-खेड) अशी तिघांची नावे आहेत. फिर्यादीच्या राहत्या घरी जेवण झाल्यानंतर पुतण्या अल्ताफ शेख हा दारूया नशेत घरात बडबड करत असल्याने जावून झोप, असे सांगितल्या राग मनात धरून त्याने फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साहिल शेख व शकिल शेख यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बाबत नसिमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.