रत्नागिरी:-रत्नागिरी एमआयडीसी येथील सार्वजनिक ठिकाण मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील सुरेश पाटील (32, रा. मिरजोळे, पाटीलवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी येथील रस्त्यालगत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित तरुण हा मद्य प्राशन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.