खेड : तालुक्यातील वेरळ येथील सायली अपार्टमेटमध्ये एकाने स्वत:या घरात बोलावून हातातील बांबुच्या काठीने डोक्यात मारहाण केल्याप्रकरणी पांडुरंग पवार (54, रा. वेरळ-सायली अपार्टमेंट) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी गोविंद रामू नलावडे (54, वेरळ-पभूवाडी) हे उद्या कामाला येणार नाही, या गोष्टीचा राग मनात धरत त्याच्या घरी बोलावून मारहाण करत गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.