डॉ. एहसान शेख यांच्या नेृतृत्वाखाली ५० यशस्वी हेड ॲण्ड नेक सर्जरी
चिपळूण : चिपळूणमधील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने सुमारे ५० हेड ॲण्ड नेक सर्जरी (३४ पुरुष आणि १७ महिला) यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मुखाचा कर्करोग ,थायरॉईड, पॅरोटीड आणि स्वरयंत्राच्या कर्करोगावर यशस्वी उपचार हे या संस्थेचे प्राथमिक ध्येय आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे कोकण विभागातील ओन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.भारतात हेड आणि नेक कॅन्सर हे पुरुषांमधील सर्वात सामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. हे महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगापैकी हे चौथ्या क्रमांकावर आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात २०२२ मध्ये अंदाजे कर्करोगाच्या घटना १९ ते २० लाख असल्याचे दिसून येते तर २०२२ च्या अहवालानुसार नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा वास्तविक घटना १.५ ते ३ पट जास्त आहेत असे स्पष्ट झाले आहे. या कर्करोगासाठी मुख्य जोखीम घटकांमध्ये तंबाखू आणि मद्यपानाचा समावेश आहे. भारतात तंबाखूच्या वाढत्या व्यसनामुळे सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के हेड आणि नेक कर्करोग आढळून येत आहेत. ५० ते ६० टक्के हेड ॲण्ड नेक कर्करोग हे स्थानिक पातळीवर प्रगत अवस्थेत असतात. अंदाजे ३५ लाख लोकसंख्येसह (रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगडचा दक्षिण भाग), नवीन कर्करोग रुग्णांची घटना एका वर्षात ७ ते ८ हजार असण्याची अपेक्षा आहे. यापैकी ५० रुग्णांवर यशस्वी उपचार झाले ज्यात ३४ पुरुष आणि १७ महिलांचा समावेश आहे. रुग्णांचे त्यांच्या कर्करोगाच्या टप्प्यानुसार वर्गीकरण करण्यात आले होते, पहिल्या टप्प्यात ९, दुसऱ्या टप्प्यात ११, तिसऱ्यामध्ये ११ आणि प्रगत टप्प्यात (स्टेज ४) १९ रुग्णांचा समावेश होता. शस्त्रक्रिया केलेल्या ५० रूग्णांच्या सध्याच्या नमुन्याचा आकार पाहता, ४०-५० टक्के रूग्ण चौथ्या टप्प्यात मोडतात. उपचारांमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ टीमचा समावेश आहे. हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजी विभाग लाळ ग्रंथी, मौखिक तसेच घशाची पातळी, स्वरयंत्र, थायरॉईड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी यासह विविध भागात सौम्य आणि घातक अशा दोन्ही प्रकारच्या ट्यूमर असलेल्या रुग्णांसाठी वैयक्तिक उपचार प्रदान करत असल्याची प्रतिक्रिया चिपळूणच्या ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे हेड ॲण्ड नेक ऑन्को सर्जन डॉ. एहसान शेख यांनी व्यक्त केली. डॉ. एहसान पुढे सांगतात की, मुखाचा कर्करोग आणि मानेच्या कर्करोगाकडे शस्त्रक्रियेच्या दृष्टिकोनातून पाहताना या रोगाचा समुळ नाश करण्याचा मुख्य उद्देश आहे. शस्त्रक्रियेनंतर कर्करोग परत होण्याचा शक्यता असताना, प्रगत रेडिओथेरपी आणि वैयक्तिकृत वैद्यकीय ऑन्कोलॉजी पद्धतींचा वापर केल्याने पुनरावृत्ती होण्याची शक्यता खूप कमी होऊ शकते. योग्य डॉक्टरांकडून नियमित तपासणी आणि वेळीच निदानास प्राधान्य देणे गरजेचे आहे. ५०-६० टक्के हेड ॲण्ड नेक कॅन्सर सामान्यतः स्थानिक पातळीवर प्रगत अवस्थेत असतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडून नियमित तपासणी आणि वेळीच निदानास प्राधान्य देणे गरजेचे आहे. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय देशमुख सांगतात की, ओन्को लाइफ केअरमध्ये, मुखाचा कर्करोग आणि मानेच्या कर्करोगाच्या ५० यशस्वी शस्त्रक्रिया करत वैद्यकिय क्षेत्रात एक नवी ओळख तयार केली आहे. ऑन्को लाईफमध्ये, या ५० शस्त्रक्रिया केवळ संख्या म्हणून न पाहता या व्यक्तींना मृत्यूच्या दारातून परत आणण्याचा आमचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येते. रोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावे याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील राहू.