आ. शेखर निकम यांची संघटना पदाधिकाऱ्यांना ग्वाही
चिपळूण : रिक्षा व्यवसायिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला. आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात रिक्षा व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न मांडून सभागृहात चर्चा घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी चिपळूण तालुक्यातील व्यावसायिकांना दिली.राज्यात रिक्षा व्यवसायिकांचे आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेऊन आ. शेखर निकम यांनी चिपळूण तालुक्यातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकारी यांना आपल्या संपर्क कार्यालयात बोलवून त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. पावसाळी अधिवेशनात सभागृहात रिक्षा चालक यांच्या परमिट बंद व दररोज आकारण्यात आलेला ५० रुपये दंड याबाबतचा प्रश्न उपस्थित करून सभागृहात चर्चा घडवून आणून रिक्षा चालक मालक संघटना यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे सांगितले.