कोंडिवली येथील घटना,शौचालयाच्या टाकीसाठी खणला होता खड्डा
खेड : पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या शौचालयाच्या टाकीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून एक दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोंडीवली येथे २३ जून रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.विकास शाहदत सरदार (वय दिड वर्षे रा. कोंडीवली ता. खेड) असे त्या मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. हे बालक खेळता खेळता टाकीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यापर्यत पोहचले. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून खड्डा तुडुंब भरला होता. यात त्या बालकाचा बुडून मृत्यू झाला. ते दीड वर्षीय बालक घरात सापडत नाही म्हणून शोध घेतला असता त्याचा मृतदेह खड्ड्यात आढळून आला. या प्रकरणी पोलिसनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.