सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या दोन जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. व्हेल माशांच्या उलट्या आणि इतर साहित्यांची तस्करी करून विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई वनरक्षक विभागाने शनिवारी 22 जून बावधन येथील रानवारा हॉटेलसमोर केली.याप्रकरणी किशोर यशवंत डांगे (वय-४५, रा. मालगुंड ता, जि. रत्नागिरी) आणि संदीप शिवराम कासार (वय-६२, रा. मालगुंड ता. रत्नागिरी) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,44, 48, 49 (ब),57,51, आयपीसी 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याबाबत वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक सारीका बन्सी दराडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर डांगे हा ड्रायव्हर असून संदीपची संदीपची शेती तसेच हॉटेलचा व्यवसाय आहे. आरोपी व्हेल माशाच्या ‘उलटी’चा तुकडा परवानगी नसताना विक्री करण्यासाठी पुण्यातील बावधन येथे घेऊन आले होते.याबाबत माहिती मिळताच मुळशी वन परिक्षेत्र विभागाने बावधन येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून व्हेल माशाची ‘उलटी’ तसेच इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 27 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.