चिपळूण:-चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. मनाली जाधव या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून त्यांनी आमदार शेखर निकम आणि माजी सभापती पुजाताई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यशस्वी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या निवडीने आमदार शेखर निकम यांच्यासह माजी सभापती आणि प्रदेश उपाध्यक्ष पुजाताई निकम, जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेशजी राणे, शहर अध्यक्षा आदिती देशपांडे तसेच विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आमदार शेखर निकम, पुजाताई निकम तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवून पक्षवाढीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे नवनिर्वाचित क्षेत्राध्यक्षा सौ. मनाली जाधव यांनी म्हटले.