चिपळूण:- चिपळूण येथे एका बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही चिपळूण, सावर्डे परिसरातून चार ते पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने 21 जून रोजी ही मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद युनुस यामीन मुल्ला याला गुढे फाटा येथील एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुमारे 40 वर्षापासून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवार, दि. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता चिपळूण तालुक्यातील गुढे फाटा येथे देवळाजवळ बांधकाम सुरु असलेल्या ओंकार अशोक चव्हाण (वय 32 रा. मो.पो. रामपुर, तळेवाडी ता.चिपळूण) यांच्या इमारतीतून बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद युनुस यामीन मुल्ला (वय 53) हा तेथे अवैधरित्या तेथे राहत असल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.
या प्रकरणाची फिर्याद समीर शामराव मोरे (वय 52), नेमणूक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट अंतर्गत रत्नागिरी येथील चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून या नागरिकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोहम्मद युनुस यामीन मुल्ला (रा.नाराईल जिल्हा, गालीया थाना, गाव- बुडीयाली, बांग्लादेश) हा सुमारे 40 वर्षापासून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय, घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून वर नमूद ठिकाणी वास्तव्य करताना मिळून आला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यात 145/2074 पारपत्र (भालात प्रवेश) 1950 कलम 3(1)सह 6(ए) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 24(अ) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस करत आहेत.
रत्नागिरी प्रतिनिधी
RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR
गुन्हेगारी
रत्नागिरीतील वरची आळी येथे मटका-जुगारावर पोलिसांची धाड
गुन्हेगारी
वेळवी येथे चोरट्यांनी एकाच रात्री फोडली तीन दुकाने
गुन्हेगारी
मुलींशी गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकाची न्यायालयाकडून शिक्षा कायम
Total Visitors
1970044
ABOUT US
मालक, प्रकाशक व सहसंपादक:-सौ. नमिता रमेश कीर(कीर पब्लिकेशन,प्रा. लि.) संपादक:- श्री. रमेश कीर मुख्य कार्यालय:- संसारे कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी
Contact us: 8080118239 expressratnagiri@gmail.com
Disclaimer Privacy
This website is Designed, Developed and Maintained by Saurabh Salvi. Phone : +91 9075930780
चिपळूण येथे बांगलादेशी नागरिकास अटक
