मराठी बरोबर इंग्रजीतून शिक्षण ही काळाची गरज – किशोरभाई नारकर
राजापूर/तुषार पाचलकर:-
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल, या 1955 साली स्थापन झालेल्या संस्थेने गेली 70 वर्ष ज्ञानदानाचे कामं करतं असताना काळाची गरज ओळखून आणि परिसरातील पालकवर्गाच्या मागणीचा आदर ठेऊन धाडसी निर्णय घेतला आणि एक यशाचं पाऊल उचलून विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.आजच्या 21 व्या शतकात जगाशी संघर्ष करायचा असेल तर विद्यार्थ्याने मराठी बरोबर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं ही काळाची गरज झाली आहे.असं मतं संस्थेचे चिटणीस किशोरभाई नारकर यांनी शाळेच्या इंग्रजी माध्यम वर्गाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केलं.
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर,पाचल येथे इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन संस्था कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ते बोलत होते.
राजापूर तालुक्यातील जवळपास अकराशे पेक्षा जास्त शिक्षण घेत असलेल्या पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ -पाचल, संचालित सरस्वती विद्या मंदिर पाचल या शाळेच्या इंग्रजी माध्यम शाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित पाचल हायस्कुल येथे आज शनिवार दिनांक 22 जून रोजी संपन्न झाला.
यावेळी पाचल गावचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक सक्रे यांनी संस्थेला या शाळेला जी लागेल ती सर्व प्रकारच्या सहकार्याची भावना व्यक्त केली
प्रसंगी पुढे बोलताना संस्थेचे सरचिटणीस रामचंद्र वरेकर यांनी शाळेत जास्तीत जास्त सुधारणा होतील अधिकाधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळतील यासाठी प्रयत्न करू असं मतं व्यक्त केलं.
उदघाटन प्रसंगी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल संचालित संस्थेचे चिटणीस किशोरभाई नारकर यांनी श्रीफळ वाढवून तर कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे यांनी फित कापून शाळेच्या इंग्रजी माध्यम वर्गाचे उदघाट्न केले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस रामचंद्र वरेकर, खजिनदार राजू लब्दे संचालक विकास कोलते सह संस्थेचे सभासद,शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई, श्री मनोहर हरी खापणे कॉलेज चे प्राचार्य डॉ एम ए येल्लूरे,पाचल गावचे माजी सरपंच अशोक सक्रे, तळवडे गावच्या सरपंच सौं गायत्री साळवी,माजी सरपंच सौं अपेक्षा मासये,केंद्र प्रमुख विनायक खानविलकर, समाजसेविका शशिताई देवरुखकर, तंटा मुक्ती अध्यक्ष मंगेश भोसले, माजी विद्यार्थी वेल्फेअर असो. चे अध्यक्ष राजू रेडीज,श्री खापणे कॉलेज चे विकास पाटील,यश कॅम्पुटर चे सी.ई.ओ.प्रकाश सावंत,सामाजिक कार्यकर्ते विलास गांगण, ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे,कासीम गडकरी, प्रियांका नारकर, ग्रामस्थ सलीम प्रभुळकर, माजी सैनिक धोंडू कोलते सह शिक्षकवर्ग शिक्षेकत्तर कर्मचारी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
