राजापूर : तालुक्यातील उपळे येथे बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसात वीज पडून एक गाय आणि एक वासरू ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी की उपळे येथील रहिवासी लक्ष्मण कोकरे यांच्या गुरांच्या गोठ्या वर रात्री वीज पडून त्यांच्या गोठ्यातील एक गाय व एक वासरू यांचा दुर्दैवी अंत झाला तसेच त्यांची पत्नी ही बाथरूम मध्ये असताना बाथरूम मधील फरशी जोराने उडून त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली. संबंधित घटना कळल्यानंतर राजापूर तहसील कार्यालय येथे संपर्क साधण्यात आला. तलाठी यांना पाठवून पंचनामा करण्यात आला. यामध्ये गोठ्याचे नुकसान न होता लोखंडी अँगल मुळे विजेचा करंट गुराना बांधलेल्या लोखंडी खांबांना जाऊन दोन गुरे गतप्राण झाली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर किनारे यांना घेऊन पंचनामा करिता आवश्यक असलेला पीएम रिपोर्ट घेण्यात आला आहे. पंचनामा ठिकाणी कमलाकर कदम तालुकाप्रमुख शिवसेना यांनी मोलाची मदत केली. तसेच सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बावधने, प्रकाश झोरे, जयराम बावदाने डॉक्टर संतोष गोरे, तलाठी भाऊसाहेब कोकरे यांचे सहकार्य लाभले.