जाकादेवी:-रत्नागिरी तालुक्यातील खालगाव शेवटची गोताडवाडी येथे गुरुवार दि. २० जून रोजी दुपारच्या दरम्याने वादळी पावसाने खालगाव शेवटची गोताडवाडी येथील १५ शेतकऱ्यांच्या घरांवरील छप्पर, कौलै तसेच ६ शेतकऱ्यांच्य गोठ्यांवरील पत्रे, कौलै उडण्याचा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांवर ऐन पावसात मोठे संकट ओढवले आहे. ही घटना आज (गुरुवारी २० जून) रोजी दुपारच्या दरम्याने घडल्याने शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले.
या घटनेची माहिती मिळतात गावचे सरपंच प्रकाश खोल्ये, तलाठी कार्यालयातील कर्मचारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी यांनी तात्काळ या शेवटच्या वाडीला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या शेतकऱ्यांच्य घरांच्या तसेच गोठ्यांच्या पडझडीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. जोरदार वादळी पाऊस त्यात विजांचा चमचमाटात हा भयानक प्रकार शेतकऱ्यांना अचानक पाहायला मिळाला. वादळी पावसामुळे ही घटना घडली आहे.या घटनेमुळे खालगाव शेवटच्या गोताडवाडीला भयंकर नैसर्गिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील शेतकऱ्यांसमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ऐन पावसात घरांवरील छप्पर उडाल्याने एकूणच या घटनेकडे प्रशासनाने लक्ष वेधून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.