संगमेश्वर:-मुंबई-गोवा महामार्गावर असूर्डे येथे रसायनाने भरलेल्या टँकरला अपघात झाला. रस्ता सोडून टँकर थेट दुकानात शिरल्याने तारांबळ उडाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने टँकर चालक चालला होता. असूर्डे येथे आल्यावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्ता सोडून थेट दुकानात घुसला. सुदैवाने या दुकानात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जीवित हानी झाली असती. या अपघात टँकर चालक किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.