खेड : तालुक्यातील भरणे येथील हॉटेल सन्मानच्या पाठीमागे जंगलमय भागात एका झाडाखाली बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगून विक्री करताना विलास तुकाराम पवार (53, रा. भरणे) यास येथील पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 3320 रूपये किंमतीची 33 लिटर दारू पोलिसांनी हस्तगत केली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल विशाल जगताप यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.