चिपळुणात खचलेल्या काँक्रिटीकरण्याचा भाग काढण्यास सुरूवात
चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील सावर्डे वहाळफाटा येथील उड्डाणपुलाजवळील 10 मीटरचा खालेल्या भागाचे काँकिटीकरण काढण्याचे काम मंगळवारपासून महामार्ग कंत्राटदार कंपनीने सुरू केले आहे. तूर्तास उड्डाणपुली एक मार्गिका बंद करून वाहतूक सर्व्हीस रोडने वळवण्यात आली आहे. खालेल्या जागी नव्याने काँकिटीकरण केले जाणार आहे.
गेले आठवडाभर कोसळत असलेल्या पावसात तेथील रस्त्याला भली मोठी भेग गेल्यानंतर त्यामध्ये पावसाचे पाणी जाऊन रस्ता खचला. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने तेथील 10 मीटरच्या भागात डांबराचे थर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जास्तच खाल्यानंतर तत्काळ ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करत खचलेले काँकिटीकारण काढण्यास सुरूवात केली. सद्यस्थितीत डावी मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे व डाव्या मार्गिकेवरील वाहतूक सर्व्हिसरोड वरून वळवण्यात आली असून उजव्या मार्गिकेवरील वाहतूक सुरळीत चालू आहे.