खेड येथे मारहाणीत एक जखमी, दुसऱ्यावर गुन्हा
खेड : तालुक्यातील पुंभाड कुंभाडवाडी येथे दारू पिऊन एकास विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी बबन तुकाराम नरवणकर (47) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत बजरंग विठ्ठल साळवी (65 पुंभाड-पुंभाडवाडी) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ते घरी असताना संशयिताने दारूच्या नशेत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर दगड उचलून डोक्यावर मारत दुखापत केल्याचे तकारीत नमूद केले आहे.
