रत्नागिरी:-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सद्या निर्माण झालेल्या राजकीय बॅनरबाजीवरून राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगून टाकले आहे. मी सोडून कोकणात सर्वा नेते. त्यामुळे ज्यांनी बॅनर लावले त्याचे मला दुःख नाही, पण अजून कुणी 10 बॅनर मला पाठवून दिले तरी माझ्या घरापर्यंत लावायला तयार असल्याचा जोरदार टोला हाणत बॅनर युद्धाचा विषय संपला असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागितील पाली आणि सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरबाजीवरून मतदार संघातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले. प्रशासनाने त्याबाबत खबरदारी घेत राजकीय संघर्ष ताणला जावू नये यासाठी ते लावलेले बॅनर उतरवण्यात आले. पण या बॅनरबाजीच्या राजकीय संघर्षावर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मला या विषयावर व कुणी बॅनर लावले याबाबत काही बोलायचे नसल्याचे स्पष्ट केले.कोकणात मी सोडून सर्व लोकांचे नेते. त्यामुळे ज्यांनी कुणी हे बॅनर लावले त्यांचे अभिनंदन आहे. अजून कुणी 10 बॅनर जरी मला पाठवून दिले तरी माझ्या घरापर्यंत लावायला तयार आहे. ज्यांनी बॅनर लावले त्यांना समाधान वाटले असेल. या विषयात महायुतिचे कार्यकर्ते कोणताही राजकीय संघर्ष वाढवणार नाहीत, ते परिपक्व कार्यकर्ते आहेत. सिंधुदुर्गात जे बॅनर लावले ते अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावले होते. त्याबाबत आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करून बॅनर उतरवण्यात आले. त्यामुळे हा बॅनर युध्दाचा विषय संपलेला आहे, मला त्या स्पर्धेत जायचे नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.