रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील माळनाका येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवार 12 जून रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास माळनाका ते थिबा पॅलेस जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल समोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी नजवान सिराज भाटकर (रा. शिवखोल, राजिवडा, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएचö08 एडब्लू8447) सोबत नागेश कृष्णा पवार यास घेऊन जात होते. लॅण्ड मार्क हॉटेल येथे रस्ता ओलांडत असताना थिबापॅलेस ते माळनाका जाणारी दुचाकी (क्र. एमएच 08 एएल 4581) वरील स्वार गोवळकर याने भाटकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नजवान भाटकर व नागेश पवार हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित आदित्य गोवळकर या स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
माळनाका येथे दोन दुचाकीच्या धडकेत 2 जखमी
