चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून येतेवेळी रसायन भरलेल्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने एका कंटनेरसह कारला धडक देऊन टँकर पलटी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यात एकजण जखमी झाला असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
लोटे येथून टँकरमध्ये रसायन घेऊन टँकर चालक तामिळनाडू येथे जात होता. तो मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून येतेवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या टँकरने एका कंटेनरला समोरील बाजूस धडक देऊन मुंबईकडे जाणाऱ्या कारलाही धडक देत पलटी झाला. यात एकजण जखमी झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर परशुराम घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातीची रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
परशुराम घाटात रसायन भरलेला टँकर पलटी होऊन तीन वाहनांचे नुकसान
