गुहागर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गुहागर तालुक्याला कोण विधानसभा निवडणूक लढवणार हे चित्र स्पष्ट नसले तरी सामाजिक व विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा स्थानिक उमेदवार असावा ही मागणी गुहागर तालुक्यात जोर धरू लागली आहे . गुहागर तालुक्यातील नामवंत वकील ॲड.सुशील सुगंधा गणपत अवेरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
ॲड.सुशील अवेरे यांनी सांगितले आहे की , “आमदार” पद हे सामान्य जनता आणि शासन – प्रशासन यामधील महत्वाचा दुवा असतो , आपल्या मतदार संघातील प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचे काम अशा व्यक्तीने केले पाहिजे. पुढील दोन महिन्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष दौरा करून गुहागर तालुका वासियांचे प्रश्न आणि त्यांची इच्छा काय आहे तसेच सध्यस्थितीत काही राजकीय पक्षांनी देवू केलेल्या या संधीसाठी , नक्की कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार यासंदर्भातील राजकीय निर्णय लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल असे त्यांनी नमूद केले .