खेड : शहरातील तीनबत्तीनाका येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून दुचाकीचे नुकसान झाले. येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
तीनबत्तीनाका येथील एका हॉटेलसमोर एम.एच. 01 ए.एफ. 1283 क्रमांकाची दुचाकी उभी होती. या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. या बाबत येथील नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रास कळवल्यानंतर फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन पणय रसाळ, जयेश पवार, प्रणव घाग, वाहनचालक विद्याधन पवार, गजानन जाधव आदी तातडीने घटनास्थळी पोहाचले. मात्र, आगा भडका उडाल्याने दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.