खेड : तालुक्यातील मांडवे येथील 52 वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. पांडुरंग सदाशिव देवरूखकर असे मृत प्रौढाचे नाव आहे. त्यांना हृदयाचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने के.ई.एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.