चिपळूण:-शहरातील धवल मार्टमध्ये तीन कामगारांनी 1 लाख 65 हजार 793 रुपयांची अफरातफर केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी 3 कामगारांवर शुक्रवारी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अरबाज दळवी (गुहागर नाका, चिपळूण), अदनान मोटलेकर (धामणदेवी) व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खेंड येथील धवल घाग व्यापारी संकुल येथे असलेल्या धवल मार्टमध्ये 1 ते 31 मे या कालावधीत तेथे काम करणाऱ्या तीन कार्मचाऱ्यानी संगनमताने 1 लाख 65 हजार 793 रुपयांची अफरातफर केली. यावेळी मार्टमध्ये बिलाचे पैसे न भरता माल घेऊन कोणी बाहेर जाऊ नये, यासाठी लावण्यात आलेल्या सेंसर मॅटिक सिस्टिमचा सेंसर बंद करुन हा अफरातफरीचा प्रकार करण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी चिपळूण पालीस स्थानकात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार त्या 3 कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.