चिपळूण:-जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मदतकार्यासाठी जिल्ह्यासाठी एनडीआरफच्या 29 जवानांची टीम आवश्यक त्या साधनांसह शनिवारी सायंकाळी येथे दाखल झाली. येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झालेल्या या टीमचे तहसीलदार प्रवीण लोकरेसह अधिकाऱ्यानी स्वागत केले. यावर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी शनिवारी पुणे येथून एनडीआरएफची 5 बीएन क्रमांकाची टीम कमांडर राज कुमार यांच्या नेतृत्वाखाली येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाली आहे. 29 जणांच्या या टीममध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. रविवारपासून ही टीम चिपळूण शहर परिसरात अभ्यास आणि त्यादृष्टीने नियोजन करणार आहे.