खेड:- तालुक्यातील आयनी येथील प्रौढाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. श्रीपत बुरटे (56) असे मृत प्रौढाचे नाव आहे. तो आंबे काढण्यासाठी झाडावर चढला असताना तोल जावून खाली पडला. उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा दस्तुरी येथे कपडे शिवण्याचा व्यवसाय होता.