उदय सामंतांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर राणेंचा बॅनर
रत्नागिरी:-कोकणातील राजकीय नाट्यानं कायमच संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं असताना आता इथूनच एका नव्या गोष्टीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राणे – सामंत यांच्यातील वादाचे मुद्दे दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आधी किरण सामंत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा कणकवली येथे लागलेल्या बॅनरने सिंधुदुर्गात खळबळ उडाली होती. ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लिंगे’ ने या बॅनर मुळे राणेंना डीवचल्यामुळे राणे समर्थकांनी मंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर राणेंचा बॅनर लावला आहे. या बॅनर वर ‘ बाप बाप होता है ‘ अशा प्रकारचा मजकूर असल्याने मंत्री उदय सामंत यांना इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता सामंत – राणे यांच्यातील सिंधुदुर्गातील बॅनर वॉर रत्नागिरीत रंगण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी दगाबाजी केल्याचे नितेश राणेंनी एका मुलाखतीत सांगितल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सामंत बंधूंचे ‘वक्त आने दो …जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे बॅनर कणकवलीत लागले होते. या बॅनरवर मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो पाहायला मिळत आहे. कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला या बॅनरची चर्चा राज्यभर चालू असताना मुंबई गोवा महामार्गावर आता उदय सामंत यांच्या निवासस्थानाबाहेर राणेंचा लावण्यात आलेला बॅनर अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर वाघाचे चिन्ह असून राणेंचा फोटो लावला आहे. आणि ‘बाप बाप होता है’ ‘झुंड मे तो कुत्ते आते है, शेर तो अकेला आता है’ असा मजकूर आहे. ग्रामीण वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार,यामुळे शनिवारी रात्री पाली येथे लावण्यात आलेल्या याच बॅनरची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुजबूज सुरू झाली होती. सामंत बंधुंवर अनेक आरोपही करण्यात आले होते. त्यातूनच राणेंना डीवचण्यासाठी कणकवलीतील बॅनर लावला होता असे चर्चिले जात होते.
त्यानंतर आता रत्नागिरी राणेंच्या लागलेला बॅनरने जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आला आहे अशीही चर्चा आता कोकण पटट्यामध्ये रंगू लागली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा असून, तो लावण्यामागचा हेतू काय? असे बोलले जात आहे.