दापोली येथून प्रौढ बेपत्ता
दापोली:-दापोली तालुक्यातील वीरसाई कोंडवाडी येथून राजेश श्रीपत राणे हा 48 वर्षीय प्रौढ बेपत्ता झाल्याची घटना 5 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलीस स्थानकात लतिका राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश राणे 5 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरातून कामाकरिता बाहेर जातो सांगून निघून गेले. संध्याकाळ पर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांची आजूबाजूला परिसरात नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. अद्याप पर्यंत ते कोठेही आढळून आले नाही म्हणून शुक्रवार दिनांक 14 जून रोजी दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली. दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार मोरे करीत आहेत.