मातीचा भराव रस्त्यावर आल्याने एसटी बस अडकली
खेड:-तालुक्यातील ऐतिहासिक महिपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या दहिवली गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची आधीच दयनीय अवस्था झाली आहे. त्यात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळच्या सुमारास मातीचा भराव रस्त्यावर कोसळल्याने वस्तीला आलेली बस अडकली. ग्रामस्थांनी अथक पयत्नानंतर मातीचा भराव हटवल्यानंतर बस खेडच्या दिशेने मार्गस्थ झाली.
मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मातीचा भराव रस्त्यावर कोसळला. यामुळे वस्तीला गेलेली एसटी बस (एम.एाा.47/बी.एल.0855) रस्त्यातच अडकली. दहिवली येथून खेडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पहिल्या पावसात मातिचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर मातीचा भराव बाजुला हटवला. या मार्गावर दरडींसह मातीचा भराव रस्त्यावर कोसळण्याचा धोका कायमच आहे. यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्या बंद होण्याची शक्यता आहे.
