रत्नागिरी:-महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी जर्मनी मधील स्टुटगार्ट येथील मर्सिडिज बेंझ च्या प्लॅन्टला गुरूवारी भेट दिली. मर्सिडिज ह्यावर्षी महाराष्ट्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हे सद्या जर्मनी दौऱ्यावर गेलेले आहेत. तेथे त्यांनी जर्मनी मधील स्टुटगार्ट येथील मर्सिडिज बेंझच्या प्लॅन्टला भेट दिली. त्यावेळी उदय सामंत आणि मर्सिडिज बेंझचे कार्यकारिणी सदस्य डॉ. जॉर्ग बर्झर, संचालिका मॅरीना केट्स, संचालक मार्टिन स्कल्झ, भारतातील कार्यकारी संचालक व्यंकटेश कुलकर्णी ह्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी मार्सिडिज बेंझ ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मार्सिडिज बेंझ कडून जाहीर करण्यात आले. त्यासमयी म. रा. औ. वि. म. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा उपस्थित होते.
मर्सिडिज महाराष्ट्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री उदय सामंत
