रत्नागिरी:-गेल्या सुमारे पावणेदोन महिने उन्हाळी सुर्ट्टीच्या मौजमजेचे दिवस संपले असून आजपासून शाळेचे दिवस सुरू होणार आहेत. आज 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. नवा वर्ग, नवा गणवेश, नवी पाठ्यपुस्तके, नवे दप्तर आणि नव्या मित्र-मैत्रिणीची गट्टी जमणार आहे. या नव्या शैक्षणिक पर्वाची उत्सुकता सर्व मुलांबरोबर पालक व शिक्षकवर्गाला लागली आहे. अशा शाळापवेशोत्सवात आज 10 हजार 571 नवागतांचे शाळेत मोठ्या डामडौलात स्वागत होणार आहे.
आज 15 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाने पुन्हा गजबजणार आहेत. त्यावेळी मुलांचे आनदंमयी स्वागत करण्यात येणार आहे. ‘शाळा पवेशोत्सव’ कार्यकमात 6 ते 14 वयोगटातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये, यासाठी विविध उपकमांचे आयोजन करण्यात येत आहे. 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे पमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा योजना शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत. शाळेत पवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण ठेवण्यासाठी सर्व शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आज शाळांची घंटा वाजणार
