चिपळूण:-कोयना जलविद्युत केंद्र फेज-3 च्या पेढांबे येथील स्विच यार्डाचे गोडावून फोडून 30 हजार रूपयांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना 11 ते 12 जून या दरम्यान घडली. याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्यादी विजया प्रशांत भोसले यांनी दिली आहे. भोसले या पेढांबे स्विचयार्डाच्या विद्युत परिरक्षण विभागात नोकरीला असून त्यांच्याकडे गोडावूनचा पदभार आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने वरील गोडावून फोडून 30 हजार 150 रुपयांचे साहित्य चोरले. यात 220 किलो वाजनाचे व्होल्ट कॉन्टॅक्ट आर्म फिंगरो जुने 35 नग, 220 किलो वाजनी व्होल्ट कॉन्टॅक्ट आर्म फिंगरी जुनी वायर 46 नग, सी.टी. कनेक्शन केबल कॉपर 4 मीटर वायर, आर्थिग केबल 220 किलो व्होल्ट जुनी 10 मीटर वायर, 40 एमएम 5 फुट लांबीचे 2 गन मेटल बार, 40 एमएम 5 फुट लांबीचा 1 जुना गन मेटल बार, 40 एमएम 5 फुट लांबीचे 2 गन मेटल बार, 30 एमएम 5 फुट लांबीचे 2 जुने गन मेटल बार, फिक्सींग बॉटम बारो 3 नग, जुने गॅडर मशिन, एक्सो ब्लेड या साहित्या समावेश आहे.