रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भंडारवाडा येथील एक प्रौढ त्याच्या घराच्या शेजारी असलेल्या विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत मिळून आला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय विश्वनाथ बोरकर (वय 55, मुळ रा. वरवडे भंडारवाडा, रत्नागिरी. सध्या : वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 12) सकाळी अकराच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे घडली. संजय बोरकर हे घराच्या शेजारी असलेल्या विहीरीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत आढळले. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यानी तपासून मृत घोषित केले.