चिपळूण :- मुंबई-गोवा महामार्गावर सर्व्हीस रोडचे काम सुरू असताना टँकरच्या धडकेने कामगार जखमी झाल्याची घटना 11 जून रोजी दुपारी 3.55 वाजता खेरशेत-बौध्दवाडी येथे घडली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष कणसे (38, कोडमळा-कणसेवाडी) असे जखमीचे, तर सिताराम मनोहर भावरे (57, युएल गडकरी मार्ग एमपीसीएल प्लॅन्ट प्रयागनगर सोसायटी चेंबर-मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार जयंतीलाल घेवरचंद नानेचा (52, व्यवस्थापक चेतक कंपनी) यांनी दिली आहे. खेरशेत-बौध्दवाडीकडे जाणाऱ्या सर्व्हीस रोडचे 11 जून रोजी डांबरीकरण सुरू असताना भावरे याने आपल्या ताब्यातील टँकर वेगाने चालवून काम करीत असलेल्या सुभाष कानसे यांना जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत.