गुहागर/वार्ताहर:- बिटकाँइन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणूककरण्यास भाग पाडून एकूण ६६ हजार ३१७ इतकी रक्कम घेऊन एका माजी बँक कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याची तक्रार दि. १० जून रोजी गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील देवघर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शाम शंकर पेवेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २८ फेब्रुवारी २०२४ ते दि. ७ जून २०२४ रोजी दरम्यान जितीन थाँमस रँनडँनी या नावाच्या अज्ञात इसमांनी संगणकीय साधनांचा वापर करुन इंटरनेट जनरेटेड क्रमांकाव्दारे वारंवार संपर्क करुन ते ब्रोकर असल्याचे भासवून पेवेकर यांचा विश्वास संपादन केला. तसेच पेवेकर यांना बिटकाँइन व क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले.अज्ञातांनी सांगितल्याप्रमाणे पेवेकर यांनी सेंट्रल बँक आँफ इंडियाचिपळूण येथील बँक खात्यातून दि. १७ एप्रिल २०२४ रोजी १६ हजार ३७१ तर दि.५ जून २०२४ रोजी फिरोज खान नामक व्यक्तीच्या खात्यावर तीन ट्रान्झँक्शनव्दारे ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. अशी एकूण ६६ हजार ३१७ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.