रत्नागिरी:-कारवांचीवाडी येथील शिवश्री हॉस्पिटलमध्ये येत्या २२ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, संधीवात, गुडघेदुखी आदी विविध आजार असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल.काही उपलब्ध औषधेसुद्धा मोफत देण्यात येतील . रक्ततपासणी, ई सी जी सवलतीच्या दरात करण्यात येतील.रुग्णांनी शिबिरासाठी 9373871999 किंवा 9422371999 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन शिवश्री हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.